कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी झाली . साने गुरुजी वसाहत परिसरात माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी रात्री साडेसात वाजता जाताना आमदार सतेज पाटील हे रामानंदनगर चौकातील गर्दी पाहून स्वतः गाडीतून खाली उतरले. आणि त्यांनी ट्रॅफिक सुरळीत करण्यास सुरुवात केली.
काही वेळातच त्यांचे कार्यकर्ते दुर्वास कदम , मॉन्टी मगदूम आणि सतीश जाधव हे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. थोड्या वेळाने पाच ते सहा पोलीस या ठिकाणी येऊन पोहचले आणि वाहतुकीची कोंडी दूर केली .

