१५७ कार्यकर्ते झाले विशेष कार्यकारी दंडाधिकारी ; अनेक वर्षांनी नियुक्ती झाल्याने चैतन्याचे वातावरण

Kolhapur news
By -

 

        


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क


इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने १५७ कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तीच्या पत्राचे वाटप करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.  गेले अनेक वर्ष या पदावरील नियुक्त्या रखडलेल्या होत्या. परंतु आज या पदाधिकाऱ्यांना पत्र दिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. 


केंद्र व राज्य सरकारच्या महत्वपूर्ण योजना तसेच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देऊया. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा व महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले.