अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी निमित्त महाराणीस अभिवादन

Kolhapur news
By -

 

          

     

   

                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त महाराणीस मल्हार सेना व अन्य बांधवांच्या मार्फत विनम्र अभिवादन करण्यात आले.

  

  सर्व सामान्य नागरिक व शेतकरी कष्टकरी यांच्या उद्धाराकरिता आपले सारे आयुष्य समर्पित करणाऱ्या या महाराणीच्या सन्मानार्थ मल्हार सेनेमार्फत महाराष्ट्रभर  दिव्य संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे हे या संदेश यात्रेचे नेतृत्व करत आहेत.आज ही यात्रा मुरगूड मध्ये दाखल झाली तेंव्हा येथील सकल बहुजनांच्या वतीने शिवतीर्थावर जल्लोषी स्वागत करण्यात आले.


  यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या इतिहासाची ओळख युवकांना करून देण्यात आली. देशभरातील महादेव मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.शेती उताऱ्यातील सात बारा हे नाव त्यांच्याच एका विधायक योजने चे मूर्त रूप आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात किंवा घरा भोवतालच्या जागेत बारा फळ झाडे लावली पाहिजेत.त्यातील सात झाडांचे उत्पन्न शेतकरी स्वतः घेईल व उरलेल्या पाच झाडांचे उत्पन्न शेत सारा म्हणून सरकार जमा करण्यात येईल.या संशोधित इतिहासा ची माहितीही लोकांना होणे गरजेचे आहे. योग्य न्यायदान, सामाजिक कार्ये आणि उद्योग वृध्दी ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ठ्ये होती.

  

  अभिवादन कार्यक्रमास  माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी नगरसेवक शिवाजीराव चौगुले,जगन्नाथ पुजारी, साताप्पा मेटकर,अमोल मेटकर, आप्पा मेटकर,समाधान बोटे,ज्योतिराम मेटकर,अप्रिलक मेटकर, प्रशांत मेटकर, राजु मेटकर, अनिल दिवटे, शिवभक्त सर्जेराव भाट,राजू चव्हाण,विक्रम गोधडे,तानाजी भराडे,सुरेश साळोखे,विजय गोधडे,इत्यादी नागरिक उपस्थित होते.