कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिक्षण व्यवस्थेत येणारी आव्हाने व शाळेत येणारे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी काम करावे असे आवाहन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हयातील शाळा आदर्श करणेसाठी जिल्हा नियोजन मंडळातून वीस कोटीची तरतूद केली असून यातून शंभर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व शाळांची दुरुस्ती करून सर्व शाळांना डिजिटल व ईलर्निंग सुविधा उपलब्ध करणार असून अंगणवाडी करीता नवीन इमारती बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .
मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी शिक्षक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार आदर्श शिक्षक पुरस्कार देवून करण्यात आला .
डॉ सुनिल कुमार लवटे म्हणाले , प्रत्येक शिक्षकांनी आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करून समाजा समोर आदर्श निर्माण केला पाहिजे. प्रमुख पाहुणे आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड, गोकुळचे संचालक युवराज पाटील व नाविद मुश्रीफ, प्रताप उर्फ भैय्या माने, प्रवीणसिंह भोसले , गटशिक्षणाधिकारी सारिका कासाेटे ,वसंतराव धुरे , सतीश पाटील , शशिकांत खोत, मनोज फराकटे , विकास पाटील , प्रकाश गाडेकर ,रमेश तोडकर , दिनकर कोतेकर , राजेंद्र माने ,जयदीप पाेवार यांच्यासह इतर नेते व तीन तालुक्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.




