देवेंद्र से बैर नहीं,सुप्रिया तुम्हारी खैर नहीं.

Kolhapur news
By -

 

           

       



            कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले


    या देशाच्या खासदार सुप्रिया सुळे परवा भलतच कांहीं बोलून गेल्या.देवेंद्र फडणवीस यांना सरळ धमकीच दिली.

    "शिंदे से बैर नहीं,देवेंद्र तेरी खैर नहीं."

      बापसे बेटी सवाई .काका आणि  बेटी  एखाद्याच्या मागे लागले की समजायचं त्या व्यक्तीचं वजन मोठं आहे.

 तो स्वच्छ आहे.जनमानसात त्याची प्रतिमा चांगली आहे.

    फडणवीस यांच्या बाबतीत अगदी ते खरं आहे.

     त्यांनी पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले.आता उपमुख्य  मंत्रीपद भूषवत आहेत.

  एका मराठी टिव्ही चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत  स्वतःच्या राजकीय कारकीर्दीचा लेखा जोखा मांडला .

  गेली २७ वर्षे राजकारणात वावरणाऱ्या या नेत्याने  विरोधी पक्ष नेता म्हणून उत्तम काम केले आहे.कोणाला शिव्या नाही ,टोमणे नाही ,मुद्देसूद अभ्यासपूर्ण मांडणी असायची आणि तितक्याच जोरदारपणे उत्तराची अपेक्षा असायची.ते उभे राहिले की मंत्री महोदय आधी मानेवरचा घाम पुसायचे.

   अश्या या देवेद्रानेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत मराठ्यांना आरक्षण दिले होते.कुणीतरी कोर्टात गेले.तिथं बाजू व्यवस्थित मांडली असती तर निश्चित  मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळाला असता.

   उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते.त्यांनी ते आरक्षण कसे फेटाळले जाईल हेच पाहिले.देवेंद्र मोठा होता कामा नये.

     उध्दव गेले आणि पुन्हा शिंदे,फडणवीस सत्तेवर आले.दरम्यान जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले. 

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना कचाट्यात पकडायला ही संधी नामी आहे असे समजून शरद काका धावत तेथे पोचले.

    मराठवाड्यातील पोरं आधीच गांजलेली होती आणि राजकीय अभ्यासात चांगली पोचलेली होती.

    मैदानात उतरलेल्या काकांना सरळ त्यांनी सिक्सरी ठोकल्या.

   चार वेळा मुख्यमंत्री होऊन तुम्हीं आमच्यासाठी काय केले ?

    नुसतं वापरून घेतलं.

तेथे काकांची नाचक्की झाली.

    काकांचा रोख शिंदे यांच्यावर होता. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना व्यवस्थित कुमक पुरवली.पोरांना निदान १०टक्के आरक्षण मिळाले. संविधान कोणालाच डावलता येणार नाही.त्यामुळे ओबीसी त पोरांची सोय होते का ते पाहण्यासाठी कुणबी दाखले काढायला सांगितले.

   थोडक्यात शिंदे फडणवीस यांनी लढाई निम्मी अर्धी जिंकली आहे.

   हे काका व त्यांची कन्या सुप्रिया यांना जड जाणारे होते.

    मध्यंतरी राज्य सभेचे कांहीं खासदार महाराष्ट्रातून दिल्लीला पाठवायचे होते.त्यातही देवेद्रजी यांची चाणक्य निती कामी आली.उध्दव,पवार यांची सत्ता असतानाही देवेंद्रजींनी बाजी मारली होती. कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांना यातूनच राज्यसभेची संधी मिळाली.

   थोडक्यात देवेंद्र हे शरद  पवारना भारी पडले.  आगामी निवडणुकीत देवेंद्र,एकनाथ,अजित व नितीन (गडकरी) हे भारी पडणार आहेत हे काकांना कळले आहे.

   म्हणून त्यांनी लेकीला पुढे करून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य (टार्गेट)केले आहे.

     अनेक विकास कामे,,लाडकी बहिण योजना,एस टी बस सवलत ,यातून महिला सबलीकरण नावाचे मजबूत अस्त्र शिंदे सरकारच्या हाती लागले आहे.या मागे देवेंद्रजींचे  राजकीय कौशल्य पणाला लागले आहे.महाराष्ट्राच्या जनतेने एक्झीट पोल मधून सुध्दा कौल दिला आहे.

   त्यामुळे सुप्रियाला पुढे करून काकांनी आपली नेहमीची कुटील राजनीती वापरली आहे.

   एवढं होऊन ही देवेंद्र फडणवीस शांत, स्थितप्रज्ञ राहिले आहेत.ठाकरे ,राऊत,सुप्रिया ,यांच्या कुंडल्या त्यांनी अजून काढल्या नाहीत.

   त्यांचे सहस्र समर्थक मात्र ठासून म्हणतात.


  "देवेंद्र से बैर नहीं सुप्रिया तुम्हांरी खैर नही."