कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कर्नाटकात पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीलाच मज्जाव केला व गणेश भक्तांना रोखले.येवढेच नव्हे तर गणेश मूर्तीसह गणेश भक्तांना अटक केले.
गणेशाची ही एक प्रकारे विटंबना असून ही हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे.
हिंदू बांधवांनी इतर कोणतीही धर्माच्या रूढी परंपरांना विरोध केला नाही,टीका केली नाही किंवा दगडफेकीसारखे प्रकार केले नाहीत.उलट इतर धर्मांचा आदर केला आहे.
सर्वधर्मसमभाव आणि धर्म सहिष्णुता जोपासणाऱ्या हिंदू धर्माला अशी वागणूक का दिली.कर्नाटकात मुस्लिम धार्जिणे काँग्रेस सरकार असल्यानेच हे प्रकार घडत आहेत.
मुरगूड मधील.हिंदुत्व वादी संघटना व शिवभक्त एकत्र आले व त्यांनी कर्नाटक सरकार व पोलिसांचा निषेध केला.गणेशोत्सवामुळे जमावबंदी आदेश असल्याने मोजक्या प्रतिनिधींमार्फत पोलिस ठाण्यात निषेध निवेदन देण्यात आले.
प्रतिनिधी मंडळात सर्जेराव भाट,जगदीश गुरव ,ओंकार पोतदार, संकेत शहा,प्रकाश पारिष्वाड,विक्रम साळुंखे ,राहुल चौगुले, पवन लाड,विशाल कापडे,इत्यादींचा समावेश होता.