डॉ स्वाती पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी

Kolhapur news
By -

 

              


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   भाजपाच्या महिला प्रदेश सचिव डॉ स्वाती पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू आहे.


शाहूवाडी पन्हाळा विधासभा मतदार संघातुन भाजपातर्फे शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार विनय कोरे हे सध्या भाजपा बरोबर असेल तरी विधानसभा निवडणुकीत ते कोल्हापूर जिल्ह्यातील ३ ते ४ जागांवर आढून बसण्याची शक्यता आहे. असे झाले तर आमदार कोरे यांची त्यांच्या मतदार संघात अडकून ठेवण्यासाठी भाजपाची मोठी खेळी आहे.


 स्वाती पाटील यांच्या रुपाने भाजपाला आश्वासक चेहरा मिळाला आहे. विनय कोरे यांची त्यांच्या मतदार संघात राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डॉ स्वाती पाटील यांचा चांगला जनसंपर्क असल्याने भाजपाची ताकद वाढली आहे.


मतदार संघात त्यांनी डोंगर कपारीतील सर्व सामान्य माणसाला आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. एकुणच त्यांची वाटचाल विधानसभेच्या दिशेने चालू आहे.

---------------------------------