कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भारताचे महान उद्योगपती रतन जी टाटा यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले.
त्यांच्या निधना मुळे देश एका राष्ट्रभक्त आणि कनवाळू व्यक्तीमत्वास मुकला आहे.रतनजी हे केवळ उद्योगपती नव्हते तर देश उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता.वीज,कृषी,वाहन व्यवसाय, अवजड उद्योग,निर्यात यामधील त्यांचे योगदान खुप मोठे होते.
कोरोना काळातील त्यांचे सेवाकार्य देशासाठी फार मोलाचे ठरले.या जागतिक संकटाला देशाने अत्यंत निर्धाराने आणि साहसाने तोंड दिले ते रतनजीं सारख्या उद्योगपतींच्या पाठिंब्यामुळे असे उद्गार येथील उद्गार वक्त्यांनी काढले.
मुरगूड मधील शिवभक्त ,समाजसेवक ,आणि जन सामान्यांच्या वतीने रतन जी ना शिवतीर्थ येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
--------------------------------------------

