ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिल्याबद्धल मंडलिक गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सानिका फाउंडेशनच्या वतीने सत्कार

Kolhapur news
By -

 

           


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   

  मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता ३० वरून ५०  खाटांची करण्याचा शासन निर्णय अन नऊ कोटींच्या निधीमुळे ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला . याबद्धल मंडलिक गटाचे माजी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष , नगरसेवक यांचा सत्कार सानिका फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला .

          

    यावेळी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिल्याबद्धल माजी खासदार संजय मंडलिक यांच्या अभिनंदना बरोबरच मंडलिक गटाचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक एस व्ही चौगले, दत्तात्रय मंडलिक ,  दिपक शिंदे अक्षय शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट आणि ओंकार पोतदार  यांचाही योगदानाबद्दल  सत्कार सानिका फाउंडेशनच्या वतीने फौडेशनचे संस्थापक , मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी व राजू चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

            

      यावेळी पांडुरंग खंडागळे , विशाल भोपळे , रणजीत सावंत , संदीप वड्ड ,शशिकांत पाटील, स्वप्नील शिंदे , जगदीश गुरव,कुणाल क्षीरसागर आजित कांबळे आदी उपस्थित होते .आभार निशांत जाधव यांनी मानले .


    


मुरगूड : उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिल्याबद्धल मंडलिक गटाच्या नामदेवराव मेंडके यांच्यासह  पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना दगडू शेणवी व अन्य


                ------------------------

.....