जिल्हाधिकारी पदाला गवसणी घालावयाची असेल तर फक्त पुस्तकी ज्ञानावरच लक्ष केंद्रित न करता सर्वच पातळीवरच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे ; यूपीएससी तयारी करणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्यासाठी देशपतळीवर १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या राहुलचा अनमोल सल्ला

Kolhapur news
By -

 


                


    यशाचा मार्ग अपयशाने सोपा होतो. पण, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत आणि धीर फार कमी लोकांमध्ये असतो. त्या मोजक्या लोकांमध्ये राहुल संकनूरचाही समावेश आहे. तो चार वेळा यूपीएससी परीक्षेत नापास झाला. या अपयशांना त्याने आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही ही दुसरी बाब आहे. तो सतत प्रयत्न करत राहिला. अखेर पाचव्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. राहुल संकनूरने अखिल भारतीय स्तरावर 17 वा क्रमांक मिळविला. अनेक अपयशानंतर यश मिळवण्याची त्याची कहाणी अप्रतिम आहे.


      राहुल संकनूर हा  हुबळीचा रहिवासी आहे. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर राहुल एका आयटी कंपनीत काम करू लागला. ही एक बहुराष्ट्रीय कंपनी (MNC) होती. पॅकेजही चांगले होते. पण, राहुलचा हेतू वेगळा होता. सुमारे 2 वर्षानंतर, त्याने आपली आरामदायक कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि UPSC ची तयारी सुरू केली. मात्र, राहुलच्या कल्पनेपेक्षा हा मार्ग अवघड होता.



राहुलला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षे लागली. चार अयशस्वी प्रयत्न कोणालाही मानसिकरीत्या मोडून पाडण्यासाठी पुरेसे होते. मात्र, या काळात त्याला त्याच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला. त्यामुळेच राहुलने अखेर पाचव्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली.


राहुलने अगदी मनापासून पहिला प्रयत्न 2015 मध्ये केला होता. त्यानंतर तो मुलाखतीच्या पातळीवर पोहोचला. पण, अंतिम यादीत स्थान मिळवता आले नाही. यापूर्वी त्याने 2014 मध्येही परीक्षा दिली होती. यानंतर 2016, 2017 आणि 2018 मध्ये त्याने पुन्हा प्रयत्न केले. 2018 मध्ये त्याने अंतिम यादीत स्थान मिळवले. जुलै 2014 मध्ये नोकरी सोडल्यानंतर त्यांनी तयारी सुरू केली होती.
ज्यावेळी राहुल संकनूर यूपीएससीमध्ये नापास झाला, त्या वेळी टीकेची पातळी वाढली होती. त्याला या परीक्षेचा नाद सोडायला सांगितले जात होते. अशा परिस्थितीचा सामना करणे नेहमीच एक आव्हान असते. मात्र, या काळात त्यांचे कुटुंब त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि त्यामुळेच यश मिळेपर्यंत तो प्रयत्न करत राहिला.


राहुल संकनूर यांच्या मते, UPSC क्रॅक करण्याच्या बाबतीत बरेच लोक परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. या काळात तुम्ही लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. नकारात्मक लोकांपासून दूर राहणे देखील महत्त्वाचे आहे. UPSC मध्ये यशस्वी होण्यासाठी, राहुल फक्त पुस्तकी ज्ञानावरच लक्ष केंद्रित करू नये तर एकूण सर्वच पातळीवरच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे लक्ष देणे आणि त्याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिल्यास यश दूर राहणार नाही.


                 -----------------------------