शिवसेनेच्या पहिल्या यादीतच के पी पाटलांची उमेदवारी जाहीर ; ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Kolhapur news
By -

 

           


   मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 65 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मधून  के पी पाटील व शाहूवाडी मधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


महाविकास आघाडीच्या 85-85-85 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित 18 जागांवर चर्चा करणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे.