कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मेरठ, उत्तर प्रदेश या ठिकाणी (स्पर्धा कालावधी दि. 23 ते 27 ऑक्टोबर 2024) सुरू असलेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय Sai कुस्ती संकुल मुरगूड ची मल्ल कु.गौरी मधुकर पाटील ही 50 किलो मध्ये सुवर्णपदकाची मानकरी ठरली
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याच्या खात्यात सुवर्णपदक मिळवून गौरीने चांगली सुरुवात केली
कुस्त्यांचा उल्लेख पुढील प्रमाणे
पहिली फेरी
गौरी विरुद्ध माही चौधरी -विद्या भारती हिला दुहेरी पट काढून चितपट करत विजय संपादन केला
दुसरी फेरी /क्वार्टर फायनल
गौरी विरुद्ध सोनल लंबोरे- कर्नाटक हिच्यावरती एकेरी पट काढून मोळी या डावावर 10-00 अशा तांत्रिक गुणाधिक्याने विजय मिळवत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला
सेमी फायनल
गौरी विरुद्ध प्रवीणा - आंतरराष्ट्रीय पदक विजेती -हरियाणा हिच्यावरती अटीतटीच्या लढतीत खेमी डावाची पकड करत पाठीवरती कब्जा करत भारंदाज डावावरती 10-00 गुण मिळवून एकतर्फी विजय मिळवत गत वर्षीच्या प्रवीणा बरोबरच्या पराभवाचा गौरीने वचपा काढून अंतिम फेरीत प्रवेश केला
अंतिम फेरी
गौरी विरुद्ध कनक कुमारी- दिल्ली दुहेरी पट काढत मोळी डावाची पकड करून कनक कुमारी वरती गौरीने 10-00 गुण मिळवत एकतर्फी विजय संपादन करून *महाराष्ट्र राज्याला* पहिल्याच दिवशी गौरीने सुवर्णपदक मिळवून देण्याची सुवर्णमय कामगिरी केली
या सुवर्णपदकामुळे पुढे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धेसाठी गौरीची निवड झाली आहे
गौरी ही शिवराज विद्यालय मुरगुड येथे इयत्ता-12 वी कला विभाग मध्य शिकत आहे.
मार्गदर्शक
त्यांना एनआयएस आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे ,माजी नगराध्यक्ष ,वस्ताद सुखदेव येरुडकर ,दयानंद खतकर ,सागर देसाई यांचे मार्गदर्शन
प्रोत्साहन
माजी खासदार.संजयदादा मंडलिक,कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक ,साई राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण , कार्यवाह आण्णासो थोरवत , प्राचार्य जी.के. भोसले, डॉ.प्रशांत अथणी ( निपाणी ) ,जय शिवराय एज्युकेशन सोसायटी व मुरगूड नगरपरिषद यांचे प्रोत्साहन लाभले .
--------------------------------


