भारत विश्वगुरू बनणार ; ब्रिक्स परिषदेत मोदींची भरीव कामगिरी

Kolhapur news
By -

 


             


            


           कोल्हापूर न्यूज  / वि.रा.भोसले


ब्रिक्स नावाची नऊ राष्ट्रांची ऐतिहासिक परिषद यंदा रशियामध्ये भरली होती.

    रशिया युक्रेन युध्दाचे ढग आकाशात गडगडत असताना ही परिषद संपन्न होते हे विशेष होय.या परिषदेत चीन आणि भारत यांच्यातील सीमावादावर सुध्दा आशादायक तोडगा निघाला आहे.पंतप्रधान मोदींची ही एक भरीव कामगिरी म्हणावी लागेल.

 परराष्ट्र मंत्री जय शंकर यांचे योगदान सुध्दा महत्वाचे आहे.

     मोदींचे अतिशय मुद्देसूद व प्रभावी भाषण हे या परिषदेतील व वैशिष्ठ्य होय.पुतीन यांनी सुध्दा त्यांच्या भाषणाला टाळ्या वाजवून दाद दिली.त्यानंतर चीन चे अध्यक्ष जिनपिंग यांचे सुध्दा भाषण झाले. ते तितकेसे प्रभावी वाटले नसले तरी दोन देशातील सीमावाद आटोक्यात आणणारे मुद्दे त्यांनी चांगले मांडले.

    या परिषदेची स्थापना 2009 सली झाली आहे.सुरुवातीला ब्राझील ,रशिया,इंडिया,चायना (BRIC) ही चारच राष्ट्रे होती.राजनैतिक आणि आर्थिक उद्दिष्टे समोर ठेऊन BRIC स्थापना झाली होती.आद्याक्षराहून बनलेला ब्रिक (विट) हा शब्द जोडणे असा अर्थपूर्ण होता.पुढे साऊथ आफ्रिका समाविष्ट झाला .त्यामुळे तो शब्द ब्रिक्स असा झाला.या परिषदेत इराण , इजिप्त, इथिओपिया व युनायटेड अरब अमीरात हे चार नवीन देश सामील झाल्याने ही संख्या आता नऊ झाली आहे.

     यातील चार देश अण्वस्त्र सज्ज मानले जातात व जगातील एकूण अण्वस्त्र साठ्याच्या निम्म्याने अण्वस्त्रे त्यांचेकडे असल्याचे मानले जाते.या चारा त भारत आहे.

    थोडक्यात गुर्गुरणाऱ्या युद्धखोर राष्ट्रांच्या सर्कशितले हे चाबुकधारी रींगमास्टरच समजायला हरकत नाही.

     युक्रेन हा रशियाचा भाऊच आहे.इराणला इस्त्रायलची कागाळी काढण्यापासून रोखता येईल,इस्रायलचे युद्ध हे कांहीं स्वातंत्र्य प्रेमी देशांशी नसून जागतिक दहशतवादाच्या म्होरक्यांच्या विरोधात आहे.दहशतवादाला सगळ्यांचा विरोध आहे.त्यामुळे त्यांना सहानुभूतीचा प्रश्न उद्भवत नाही.इस्रायल ला त्यांच्या हक्काचा असा स्वतंत्र वाळवंटी प्रदेश मिळाला होता.मोदींनी इस्रायलला पाठिंबा दर्शविला आहे.

    इकडे पाकिस्तान ब्रिक्स कडे पडद्याआडून डोकावला असता त्याचा आका (चीन)तेथे बसलेला दिसला असेल. उपासमारीमुळे  पाकिस्तान कोणाची कळ काढण्याची ताकद हरवून बसला आहे.

    मोदींची शिष्टाचार पद्धत जिव्हाळा युक्त वाटते कारण ते समोरच्या राष्ट्रप्रमुखाला सरळ आलिंगन देतात.पाठ थोपटतात. जिनपिंग ला आलिंगन दिले नसले तरी मागच्या पेक्षा त्यांचा चेहरा हसरा करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत.

     रशिया युक्रेन युद्धात तडजोड करण्यात मोदी यशस्वी झाले तर विश्वगुरू च्या आसनाजवळ पोचायला वेळ लागणार नाही.

   अमेरिकेत ट्रम्प आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस हे आगामी राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.दोघांचे ही मोदी यांचेशी चांगले स्नेहसंबंध आहेत.

     मोदींना सर्व मोठाली  राष्ट्रे अत्यंत सन्मानाने वागवतात. त्यांचा अस्सल भारतीय पोशाख सुध्दा त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला पुष्टी देतो.हा पोशाख त्यांनी अलीकडे सुरू केला आहे.सुरुवातीला ते सूटा बुटात जायचे.विरोधकांनी त्या ड्रेस च्या किमती काढायला कमी केले नव्हते.मोदींनी ती ही त्यांची संधी हिरावून घेतली आहे.

      राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींच्या नेतृत्वाचा प्रभाव असाच राहिला तर  भारत विश्व गुरूपदा पासून दूर नाही.

                 ---------------------------