शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत समरजित घाटगे यांना उमेदवारी ; ४५ उमेदवार घोषित ; बारामती मधून अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार

Kolhapur news
By -

 

       


      मुंबई :महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी सायंकाळी आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.  कागल मधून समरजित घाटगे यांना उमेदवारी मिळाली आहे . इस्लामपूर येथून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मुंब्रा- कळवा येथून पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड व इंदापूर येथून हर्षवर्धन पाटील यांना तर तासगाव मधून रोहित आर पाटील ना उमेदवारी देण्यात आली आहे.


   शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी   पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवार गटाच्या यादीनुसार स्वतः जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे चुलते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होईल. त्यामुळे बारामतीत लोकसभा निवडणुकीसारखीच हायव्होल्टेज लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. 


                     काका × पुतणे

                  ------------------------