कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखलीचे माजी सरपंच सुरेश पाटील, अजित लोहार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मुरगूड येथे झालेल्या परिवर्तन मेळाव्यामध्ये राजे समरजितसिंह घाटगे यांच्या गटांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते व कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार साहेबांनी फक्त AB फॉर्म दिलेला नसून आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे.हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अहोरात्र कष्ट घेऊ. तसेच गटामध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान ठेवू .जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळामुळे आपण परिवर्तनाची लढाई जिंकणारच आहोत.
ते पुढे म्हणाले, गेली २५ वर्षे कागलची बारामती करतो, हे वाक्य खूप ऐकलं , त्यासाठी बारामतीकरांनाच बोलावून विचारलं, कागलचं बारामती झालं का बघा म्हणून...
--------------------------





