संजय घोडावत यांना फेमिना अचीव्हर्स अवॉर्ड प्रदान

Kolhapur news
By -

  

       


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      घोडावत ग्रुपची गृह उपयोगी वस्तूंच्या उत्पादनातील वाढ , विमान व शिक्षण क्षेत्रातील प्रगती, किरकोळ बाजारपेठ,बांधकाम, टेक्सटाइल व खाणकाम उद्योगातील भरारी यामुळे यावर्षीचा टाइम्स संस्थेकडून दिला जाणारा फेमिना अचीव्हर्स अवॉर्ड, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात संजय घोडावत यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते आदिनाथ कोठारे, डिझायनर शितल बियाणी उपस्थित होते.


   यावेळी बोलताना घोडावत म्हणाले, की हा पुरस्कार मिळणे एक मोठा सन्मान आहे. घोडावत समूहाच्या अथक परिश्रम आणि वचनबद्धतेचे हे फळ आहे. माझे सहयोगी, मित्र, कुटुंब,भागधारक आणि हितचिंतक यांचेकडून वर्षानुवर्ष मिळालेल्या मदतीबद्दल मी आभारी आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही काम यशस्वी झाले नसते. या पुरस्कारासाठी शितल बियाणी यांनी माझी निवड केली त्याचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो.


      -----------------------