मुरगूड मध्ये शिव मल्हार यात्रेचे जल्लोषी स्वागत.

Kolhapur news
By -

 


        



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ,कोल्हापूर विभागा मार्फत काढलेल्या शिवमल्हार यात्रेचे मुरगूड मध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले.

     ऐतिहासिक आणि ओजस्वी अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याची  ३५० वर्ष पूर्ती आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षा निमित्त शिवमल्हार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

     या दोन महान विभुतिंच्या मुळेच या देशात देव, देश आणि धर्म यांचे रक्षण होत आले आहे. त्यांचे जतन आणि जागरण झाले पाहिजे असे परखड विचार मुरगूड येथील शिवतीर्थावर वक्त्यांकडून मांडण्यात आले.

   अहिल्या बाई होळकर या राज्यकर्त्या आणि समाज सुधारक होत्या.त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक विहिरी खोदल्या,पावसासाठी झाडे लावली ,प्रत्येक शेतात किमान १२ झाडे लावावीत ,त्यातील सात झाडांचे उत्पन्न शेतकऱ्यांनी घ्यावे व उरलेल्या ५ झाडांचे उत्पन्न शेत सारा म्हणून सरकार जमा करावे असे आदेश काढले.तेंव्हा पासून ७/१२ हा शब्द सरकार दप्तरी प्रचलित झाला आहे अशी माहिती श्रोत्यांना देण्यात आली.

    स्त्रीयांचा आत्मसन्मान , धर्मकारण आणि राजकारण यातील त्यांचा सहभाग अहिल्या बाईंच्या पासून झाला.

    देशातील चार धाम, महाराष्ट्रातील जेजुरी ,गुजरात मधील सोमनाथ अशी अनेक मंदिरे व धार्मिक स्थळे सांस्कृतिक बंधना खाली आणण्याचं मोलाचे काम अहिल्याबाईंनी केले.

    छत्रपतींच्या आणि राणी अहिल्या बाईंच्या घोषणांनी शिवतिर्थाचा परिसर दणाणून गेला.

    या सोहळ्यास शिवभक्त सर्जेराव भाट,बजरंग सोनुले,महादेव वागवेकर,वासुदेव मेटकर,सुरेश गोधडे,तानाजी भराडे,अमोल मेटकर,ओंकार देसाई,संकेत चौगुले,भगवान गुरव, जोतीराम मेटकर,अक्षय मेटकर, आनंदा चांदेकर , पारिष्वाड, वि.रा. भोसले,शिवाजी चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.