सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Kolhapur news
By -

 


       

        



   सध्या सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. या काळात देशातील  शेतकऱ्यांना  मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा  18 वा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळं 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले जाणार आहेत.


     पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल.


जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना प्रथम https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल. 


मुख्यपृष्ठावरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा.


     यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा.


यानंतर Get Status वर क्लिक करा.


यानंतर, हप्त्याशी संबंधित स्थिती स्क्रीनवर दिसेल.


मोबाईल ॲपद्वारे शेतकरी त्यांच्या पेमेंटची स्थिती तपासू शकतात. 

--------------------------------------------