कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिरढोण (ता.शिरोळ) येथील सुपुत्र प्रमोद महादेव चौगुले(पांचाळ) यांनी सैन्यदलात प्राणांची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमांचं १७ वर्षे ६ महिने रक्षण केले. भारतीय सैन्यदलातून(सिग्नल्स) सेवानिवृत्त होऊन शिरढोण गावी परतआले असता गावाच्या वेशीवर ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यांचा सत्कार केला.गोव्याला प्रशिक्षण झाले.मध्यप्रदेश(सागर),पश्चिम बंगाल (सुकना),चंदीगड,कारगील,इंदोर,हरियाणा (अंबाला) देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती या आगळ्यावेगळ्या सन्मानाने फुलून आली. या वेळी भावना मोकळ्या करताना त्यांना आनंदाश्रूही आले. भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात.
अशा सैनिकांचा ग्रामस्थांना अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा. या हेतूने उपसरपंच शक्ती पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे ठरविले होते. यावेळी गावातील महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. नागरिकांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. 'भारत माता की जय' असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने शिरढोण-टाकवडे हद्दीतील लक्ष्मी मंदिर पासून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. याठिकाणी ध्वज पताकाही लावण्यात आल्या. मिरवणूकीत देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले.
या सत्कार व मिरवणूक कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर,सरपंच शर्मिला टाकवडे,मा.सरपंच दिलीप पाटील,बाबासो हेरवाडे,सदस्य भास्कर कुंभार,रवी कांबळे,आरिफ मुजावर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------------------