मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती बारामती विधानसभा मतदारसंघाची. आता अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून एनसीपीचे उमेदवार असतील अशी घोषणा तटकरे यांनी केली. याबरोबरच येवल्यातून छगन भुजबळ, कागल मधून हसन मुश्रीफ ,चंदगड मधून राजेश पाटील ,परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे
---------------------

