शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डॉ. डी वाय पाटील ९१ व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबीयांनी औक्षण करून दादासाहेबांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. यावेळी दादासाहेब यांची ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तके गरजवंत विद्यार्थ्यांना वितरीत केली जाणार आहेत.
दादासाहेबाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, डॉ. विजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, अजिंक्य डी. पाटील, सुप्रियाताई पाटील, डॉ. नंदिनी पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा, राजश्री काकडे, वैजयंती संजय पाटील, शिवानी पाटील, पूजा पाटील, मेघराज काकडे, डॉ. रष्मित चोलेरा, डॉ.पालशेतकर, आमदार ऋतुराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, स्मिता योगेश जाधव, सोमनाथ पाटील, भरत पाटील, करण काकडे, चैत्राली काकडे, स्नेहल समीर मुळे यांच्यासह सुना, जावई, नातसुना-जावई, नातवंडे- पणतवंडे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनद्वारे दादासाहेबाना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, अजित पाटील बेनाडीकर, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे डॉ. डी. आर. मोरे, डॉ. व्ही. एम. पाटील, जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रमाताई बोंद्रे, अभिषेक बोंद्रे, अण्णासाहेब चव्हाण पाटील, धैर्यशील पाटील, गोकुळचे संचालक, श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य,पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून दादासाहेबांना शुभेच्छा दिल्या.
------------------

