कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या १७ वर्षा खालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली . याबद्धल जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा.खा. संजयदादा मंडलिक यांनी या संघाचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे .
श्री. मंडलिक यांनी खेळाडूंशी संवाद साधत भोसे फाटा ( मिरज ) येथे झालेल्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेची माहिती घेवून राज्य स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्हॉलीबॉल प्रशिक्षक , माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांच्यासह संघातील उद्धव चौगले ( कप्तान ) , विश्वराज जाधव , विक्रम रानमाळे , मितेश सावंत , रोहन भारमल , संस्कार हासबे , तन्मय भारमल , साकेत शेंडगे , श्रेयस भारमल , वीरधवल चौगले , पार्थ महाजन या खेळाडूंचे कौतुकही केले .
मुरगूड : राज्य स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या शिवराज विद्यालयाच्या संघाचे अभिनंदन करताना माजी खास. संजय मंडलीक समवेत महादेव कानकेकर
.....


