नानीबाई चिखलीतील नियोजित संगमेश्वर सहकारी दुध व्यावसायिक संस्थेचा दुध संकलन शुभारंभ

Kolhapur news
By -

 

          


           

                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रविणदादा भोसले यांचे मार्गदर्शनाखाली नियोजित संगमेश्वर सहकारी दुध व्यावसायिक संस्थेचा दुध संकलन शुभारंभ  गुरुवार दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी पार पडला.यावेळी मुख्यप्रवर्तक अजित कोकणे, सचिन सुर्यवंशी , अजित मगदुम  यांची प्रमुख उपस्थिती होती  .शुभारंभ सौ व श्री सुभाष कोकणे यांचे हस्ते करण्यात आला.श्री संगमेश्वर चौक येथे पार पडाला.


यावेळी  आप्पासो चौगुले,धनाजी घाटगे,विजय चौगुले, समर्थ कोकणे, सुधाकर पाटणकर,धोंडिराम वाडकर, विकास पोवार, विलास पोवार, रहीम जमादार भाऊसाहेब कुंभार, शशिकांत मगदूम, गंगाराम कळमकर, सदाशिव संकपाळ सर्जेराव संकपाळ आदी दुध उत्पादक उपस्थित हाेते.