कोल्हापूर न्यूज नेटवर्क
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नानीबाई चिखलीत दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये ही दौड प्रथमच काढण्यात आली.
प्रारंभी हनुमान मंदिर येथे शिवराय पुतळा, दुर्गामाता आणि अंबाबाई च्या प्रतिमेचे पूजन कागल तालुका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष विजय आरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दाैडला सुरुवात झाली. ही दौड गावातील मुख्य रस्त्यावरून लक्ष्मी मंदिरापर्यंत गेली , मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर पोतदार गल्ली ,चावडी गल्ली , दत्त मंदिर गल्ली , मगदूम गल्लीतून ही दाैड काढण्यात आली . या दौडमध्ये तरुण आणि लहान मुलांचा समावेश होता .यावेळी जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या.
दुर्गामाता दौड चे संयोजन गोपाळ काटकर ,बाजीराव पाेवार ,सचिन काकडे , राहुल गुरव, अनिल देवडकर, महेश मार्तंड, प्रीतम सवळेकरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
-----------------------------------------------------