परदेशात एमबीबीएस पूर्ण करून भारतात परतणारे ८० टक्के विद्यार्थी भारताच्या पात्रता परीक्षेत ठरतात अयशस्वी ; लाखो रुपये खर्च करून ही पदरी निराशा ; पालकांची चिंता वाढली

Kolhapur news
By -

 

             


    मुंबई : परदेशात एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सतत वाढत आहे. मात्र, परत आल्यावर राष्ट्रीय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेत तात्पुरते किंवा कायमस्वरूपी नोंदणी मिळण्यापूर्वी घेतली जाणारी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन (एफएमजीई) ही परीक्षा ते उत्तीर्ण करू शकत  नसल्याचे चित्र समोर येत आहे . लाखो रुपये खर्च करून ही पदरी निराशा येत असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये चिंता वाढली आहे . 


   या परीक्षेतील उत्तीर्णतेचे प्रमाण २४% वरून १६% पर्यंत खाली आले आहे. म्हणजेच सुमारे ८०% विद्यार्थी एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरतात. परिणामी , ते भारतात येऊन वैद्यकीय व्यवसाय सुरू करू शकत नाहीत.  हजारोंच्या संख्येने भारतीय विद्यार्थी रशिया, युक्रेन, चीन, आर्मेनिया आणि जॉर्जिया सारख्या देशांमधून एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करून परत येतात.अशा मेडिकल ग्रॅज्युएट्ससाठी नेशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) कडून फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (एफएमजीई) आयोजित केली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेत तात्पुरते/कायमस्वरूपी नोंदणीसाठी पात्र मानले जाते. भारतात वैद्यकीय सेवा सुरू करण्यापूर्वी ही नोंदणी आवश्यक आहे.


१२ जानेवारी २०२३ रोजी विदेशातून एमबीबीएस केलेले ६० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी एफएमजीई परीक्षेत सामील झाले. त्यापैकी केवळ १० हजार विद्यार्थ्यांनीच परीक्षा उत्तीर्ण केली. उत्तीर्ण होणारे विद्यार्थी केवळ १६% होते. तेच २०२१ मध्ये हे प्रमाण २४.५३ होते.  त्यानंतर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दरवर्षी घटतच आहे. अपयशाचे प्रमाण सतत वाढत असल्याने हे चिंताजनक  परिस्थिती आहे. 


 विद्यार्थी या परीक्षेत अपयशी होण्यामागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशात शिकताना भारतीय परीक्षेच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी, परीक्षेचा सखोल अभ्यास करणे आणि आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे कठीण जाते. 


           --------------------