कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आदमापुर येथील बाळु मामांच्या पांढरीत अगदी उड्डाण पुलानाजिक पूर्वेच्या बाजूला असलेल्या ओढ्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
खरकट्या पत्रावळ्या,प्लास्टिक च्या पिशव्या, कागदांचे ढीग,औषधांच्या बाटल्या आइस्क्रीम व खाद्य पदार्थांचे कप ,कुजलेले इतर पदार्थ आणि या सर्वांना बरोबर घेऊन संथपणे वाहणारा ओढा यामुळे अक्षरशः नरक सदृश अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली आहे.
घाण पाण्याचा निचरा अदमापुरच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पाझरत रहातो .त्यामुळे गावात रोग राई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बाळूमामा मंदिरात रोज हजारो भाविक दर्शन घेत असतात.भाविकांनी फेकलेल्या वस्तूंमुळे जो कचरा होतो त्याचे निर्मूलन नीट होत नाही .हा कचरा शेजारच्या ओढ्यात साठून रहातो . तेथील दूषित पाणी पुढे नदीला जाऊन मिळते.त्यामुळे नदीकाठच्या गावांत सुध्दा रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र,कानार्टक, तेलंगणा येथून लाखो भाविक बाळूमामा मंदिरात येत असल्याने हा धोका उत्तरोत्तर वाढत जाणार आहे.
याकरिता ग्रामपंचायत यांनी याची जबाबदारी स्वीकारून या कचऱ्याचे योग्य निर्मूलन करावे व नागरिकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका टाळावा असे निवेदन बाळूमामा भक्त व शिवभक्त,सामाजिक संस्था व कार्यकर्ते,व त्रस्त नागरिकांच्या वतीने दिले आहे.
------------------------


