नानीबाई चिखलीत उसाचा फड पेटला

Kolhapur news
By -

          



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     नानीबाई चिखली येथील गौसबी दादन मलंग यांचा उसाचा फड पेटला . ऊसाला लागलेली आग वेळीच लक्षात  आल्याने ही आग विझवण्यात तातडीने यश मिळाले .  चिखलीतील तरुणांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केल्यामुळे पुढील अनर्थ टळला . 

            

      महावितरणच्या विजेच्या ताराही या उसाच्या शेजारी नसल्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. ही आग शंकास्पद असल्याचे ही बोलले जात आहे . 





                       ----------------------