कुरणी बंधाऱ्यावरचे खांब ढासळतआहेत ; वाहतुकीस धोका

Kolhapur news
By -

 


          



        

              


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       मुरगूड जवळील वेदगंगा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आता जीर्ण होत आला आहे. बंधाऱ्यावर दोन्ही बाजूस असलेले कठडा खांब एकेक करून ढासळत आहेत.त्यामुळे वाहतुकीस बंधारा धोका दायक बनला आहे.

  

  खालून पाण्याचा वाहता प्रवाह आहे.पुलावरून शाळेची मुले पायी किंवा दुचाकीवरून जातात. वडाप व अवजड वाहनांची पण वाहतूक सुध्दा सुरू असते.तुटलेल्या खांबामुळे  वाहतुकीचा अंदाज( judgement) येत नाही असे वाहन चालकांचे म्हणणे आहे. पोहायला न येणारी मुली व महिला यांना तर बंधारा पार करतांना खुप भिती वाटते.

    याबाबत पाटबंधारे विभागास नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती व्हावी ,मजबुतीकरण व्हावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

     या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास बंधारा रोको आंदोलन करण्याचा इशारा मुरगूड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

              -------------------------