निढोरी पुलावरील रस्त्याला भेगा ; निकृष्ट दर्जाचे काम ; नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन.

Kolhapur news
By -

 

             


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    वेदगंगा नदीवर निढोरी नजीक मोठा पूल आहे.या पुलावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या उभ्या भेगा पडल्या आहेत.या भेगा एवढ्या मोठ्या आहेत की त्यामध्ये वाहनाच्या टायर्स अडकत आहेत.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

   या गंभीर प्रकाराची नोंद घेऊन मुरगूड येथील शिवभक्त संघटना व प्रवासी नागरिकांनी निकृष्ट कामाबद्दल तक्रार केली.तसे निवेदनही त्यांनी संबंधित बांधकाम खाते (PWD ) व कंत्राटदार यांचेकडे निवेदनही दिले.

   सर्व प्रवासी व नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुध्दा केले . कंत्राटदार यांचे प्रतिनिधी तातडीने दाखल झाले असून रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले आहे. 

     निवेदनावर खालील शिवभक्त संघटकांच्या सह्या आहेत.

  सर्जेराव भाट,शंकर शिंदे,तुकाराम ढेरे,संदीप भाकरे,पांडुरंग प्रभावळे,रमेश पाटील,सुनील शिंदे,सुहास भाकरे,सुहास भाकरे,पांडुरंग संकपाळ,विश्वास दरेकर, सातापा भाकरे,महेश सावंत,जगदीश चितळे. 

        


          -------------------------