लकी कारच्या अंत्यसंस्कारासाठी खर्च केले चार लाख

Kolhapur news
By -

 

              


   कार खरेदी केल्यानंतर घरची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारू लागली. गावात शेतीसोबतच त्यांचा व्यवसायही वाढू लागला.तेव्हापासून त्यांचे संपूर्ण कुटुंब या कारला लकी मानू लागले. पण गाडी जुनी ही झाली पण ती विकायची ही नव्हती  म्हणून त्यांनी मोठ्या धूमधडाक्यात आणि संतांच्या सहवासात गाडीचा निरोप घेण्याचा विचार केला. पूर्ण थाटामाटात गाडीचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तेही डीजेच्या तालावर. १५०० नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्यासाठी भोजन समारंभाचे ही आयोजन करण्यात आले होते . 


  गाडीचे मालक गुजरात जिल्ह्यातील पदरसिंगा गावातील संजय पोलारा  सांगतात की, मी गेल्या दहा वर्षांपासून ही कार चालवत आहे. गाडी आल्यानंतर माझी आर्थिक प्रगती सुरू झाली. ही कार माझ्यासाठी भाग्यवान आहे.  त्यामुळेच मी ती विकण्याचा विचारही केला नाही. गाडीच्या अंत्यसंस्कारासाठी मी चार लाख रुपये खर्च केले आहेत.

                   ---------------------