देवचंद महाविद्यालयात छात्रसेना दिवस समारोह उत्साहात साजरा.

Kolhapur news
By -

 

         



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      देवचंद महाविद्यालय येथे राष्ट्रीय छात्रसेना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या जी.डी. इंगळे मॅडम तसेच छात्रसेना विभाग प्रमुख मेजर डॉ.अशोक डोनर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे  व  एन.सी.सी. ध्वजाची पूजा करुन सुरुवात करण्यात आली . त्यानंतर  रायफल गार्ड्स नी ध्वजाला सलामी दिली .

प्रमुख पाहुण्यांचे हस्ते केक कट करून साजरा करण्यात आला  या वेळी द्वितीय वर्ष छात्र सैनिक कैडेट अदिती घस्ते , कैडेट सरिता कोळी , कैडेट अथर्व माने, कैडेट समृद्धी खपले, कैडेट तनुजा पाटील , कैडेट अनुजा पाटील व प्रथम वर्ष छत्रसैनिक कैडेट स्वप्नील तिप्पे 

यानीं आपले मनोगत व्यक्त केले. मेजर डॉ.अशोक डोनर यांनी विद्यार्थ्यांना एन.सी.सी संघटन, प्रशिक्षण, शिबीरे यातूनच छात्रसैनिकांचे मानसीक, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक जडणघडण होते असे स्पष्ट केले.

प्राचार्या जी.डी. इंगळे मॅडम यांनी छात्रसेनेचे राष्ट्रबांधणीतील योगदानाबद्दल मार्गदर्शन केले.आजपर्यंत अनेक छात्र सैनिकानी लष्करी सेवेसह जीवनाच्या विविध क्षेत्रात महत्वाची पदे भूषविली आहेत.अनेकविध उपक्रम राबवून संघटन कोशल्य, देशप्रेम, सामाजिक भान, शिस्तबध्दता, संघर्ष करण्याची कला, साहसी जीवन, कार्यतत्परता संवाकोशल्य इत्यादी गुणांच्या विकासाबरोबरच शैक्षणिक विकासासाठी आपल्या महाविद्यालयातील छात्रसेना कार्यरत आहे अशी प्रशंसा केली.

कार्यक्रमाला प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष कॅडेट उपस्थित होते . 

अंडर आफीसर  सृष्टी पाटील , सी.पी.एल. तेजश्री कमते  यांनी कार्यक्रम पार पडण्यास परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सि.क्यु.एम.एस.पूजा तोरसे व सी्.पी्.एल.समीक्षा भोसले यांनी केले .सृष्टी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. 

कार्यक्रमाची सांगता छात्रसेना गीताने करण्यात आली . उपक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष आशिष भाई शाह, उपाध्यक्षा तृप्ती भाभी शाह,खजीनदार सुबोध भाई शाह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


          -----------------------------