महाराष्ट्र विधान सभेचा निकाल म्हणजे जनतेचा राज्यकर्त्यांना संदेश. "यह ट्रेलर है, पिक्चरअभी बाकी है."

Kolhapur news
By -

 

          


             कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले


महाराष्ट्रात विधान सभेचा निकाल  साऱ्या देशाला अंतर्मुख करणारा आहे.क्रमाने जाऊ.

छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून व त्यांच्याच जयजयकाराने राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना  महाराष्ट्रीय जनतेने दिलेला हा एक संदेश आहे. तो खुप काही सांगून जातो.

  एकतर विरोधकांनी शिवरायांचा जागोजागी केलेला अवमान मतदारांना आवडला नाही.तुष्टीकरणाच्या राजकारणात एका विशिष्ठ समाजालाला  संतुष्ट करण्यासाठी त्यांनी शिवरायांच्या प्रतिमेचा अव्हेर केला, हार सुध्दा अर्पण केला नाही.

     महाराष्ट्रात ७० टक्क्यांहून अधिक असलेल्या जनसमुदायाच्या देव देवतांचा सुद्धा जागोजागी अवमान झाला .सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल झाले. टीव्ही चॅनेल वृत्तपत्रांनी मात्र अशा प्रचारातून अंग काढून घेतले होते.त्यांच्या मर्यादा त्यांनी सांभाळल्या असल्या तरी मोबाईल मोर्चे एकप्रकारचे सकारात्मक वातावरण तयार करण्यात अत्यंत यशस्वी झाले.

    एक है तो सेफ है , बटेंगे कटेंगे या घोषणांनी महायुतीला मोठे यश मिळवून दिले आहे.

    कसे ते पहा.

लोकसभेच्या वेळी व्होट जिहाद मुळे महायुतीला जबरदस्त फटका बसला होता.त्याचा फायदा घ्यायचा म्हणून विरोधी महाविकास आघाडीने आत्मविश्वासाने पावले टाकायचे ठरवले होते.

   महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी बांधलेले  आडाखे चुकीचे ठरले.

   याला पाडा त्याला गाडा ही त्यांची व जरांगे यांची नीती कामी आली नाही.

 दुसरे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहाद ला धर्मयुद्ध ने उत्तर दिले.

     दुसरे एक प्रमुख कारण म्हणजे महायुती सरकारने आणलेल्या योजना प्रत्यक्षात उतरवून दाखवल्या.त्या योजनांना कोर्टात आव्हान देण्याचा प्रयत्न पण महाविकास आघाडीने केला.तो यशस्वी न झाल्याने त्यांनी तसल्याच प्रतिघोषणा करून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला.पूर्वीच्या खटाखट योजनेचा अनुभव असल्याने महिला मतदारांनी त्यावर विश्वास ठेवला नसावा.

     एकंदरीत मतदार जाती पातीच्या,तोडफोडीच्या, तुष्टीकरणाच्या राजकारणाला कंटाळला आहे. 

  शाश्वत विकास व देव देश आणि धर्म या क्रमानेच राज्यकारभार चालू द्या असा आशीर्वाद जनता जनार्दनाने दिला आहे.

    देशाला विसरु नका,देवाला दुखवू नका धर्माला मात्र तिसरे स्थान ठेवा असाच संदेश मतदारांनी दिला आहे.

     एका वाक्यात सांगायचे तर

  यह तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है.असा आदेश जनतेने दिला आहे.


               -------------------------