महायुती सरकारच्या प्रचंड विजया बद्दल मुरगूड मध्ये पेढे वाटून आनंदोत्सव .

Kolhapur news
By -

 

          


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्व वादी  महायुती सरकारच्या प्रचंड विजयाबद्दल मुरगूड मध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

    ओकसभेच्या वेळी व्होट जिहाद चा फटका बसून महायुतीचे मोठे नुकसान झाले होते.त्यावेळी ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या.विधान सभेला सुद्धा महाविकास आघाडीचे वारे सुरवातीला होते.पण सोशल मीडियावर हिंदुत्व वादी विचारांचे जणू वादळच पहायला मिळाले.व्होट जिहाद ला धर्मयुद्ध असे आव्हान देण्यात महायुती यशस्वी झाली.परिणामी हिंदुत्ववादी मतदारांचे ध्रुवीकरण होऊन युतीचा प्रचंड विजय झाला.महाविकास आघाडीला ५० चा आकडा सुद्धा गाठता आला नाही. एक्झीट पोल च्या अंदाजा पेक्षा मोठा विजय महायुतीला मिळाला.मुरगूड येथील हिंदुत्ववादी संघटनांनी पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला.

    

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

    

    संघटनेचे तानाजी भराडे,सर्जेराव  भाट,ओंकार पोतदार,जगदीश गुरव,प्रकाश पारिश्वाड, युवराज सूर्यवंशी,महादेव वागणेकर,पांडुरंग मगदूम, सुभाष अनावकर, धनंजय सूर्यवंशी, रणजीत मोरबाळे, उमेश कुलकर्णी,प्रशांत सिद्धेश्वर,पवन लाड,गणेश भाट,इत्यादी अनेक कार्यकर्ते या उत्सवात सहभागी झाले.

हिंदुत्ववादी विचाराचा जागर सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी संघटनेकडून करण्यात आला.

             


                        ---------------------