ज्येष्ठ नागरिकांनी ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळविण्यासाठी नोंदणी कशी करावी?

Kolhapur news
By -

 

         


केंद्र सरकारने ७० किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत वय वंदना कार्ड देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठांसाठी बहुप्रतिक्षित आयुष्मान भारत आरोग्य विमा सुरू करण्याची घोषणादेखील सरकारने केली. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. 

तर ज्येष्ठ नागरिकांनी ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळविण्यासाठी  नोंदणी कशी करावी?.


आधार कार्डमध्ये नोंदवलेल्या वयानुसार ज्येष्ठ व्यक्तीचे वय ७० वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे, असा पात्रतेचा एकमेव निकष आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी नाव नोंदणी आणि आयुष्मान कार्ड जारी करण्यासाठी आधार- आधारित ई-केवायसी अनिवार्य आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नाव नोंदणीसाठी आधार हे एकमेव कागदपत्र आहे.


आयुष्मान भारत योजने अंतर्गत देशातील प्रत्येक उत्पन्न गटातील सर्व लोकांना आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल. यासाठी पात्र लोकांना पीएम जनआयोग योजना https://beneficiary.nha.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा आयुष्मान अॅपच्या मदतीने अर्ज करता  येईल.

                    --------------------