कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विश्वरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध नगर तसेच पंचशील नगर मधील बौद्ध बंधू-भगिनींच्या मार्फत अभिवादन करण्यात आले.
बौद्ध नगर मधील उपासक -उपासिकांनी गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर रात्री 10.00 वाजलेपासून अभिवादनाची तयारी सुरू केली होती.परिसर स्वच्छता राबवून. रात्री 12.00 वाजता परिसरातील महिला, पुरुष , तरुण- व बाल उपासकांनी एकत्र येत सामूहिक त्रिशरण पंचशील ,बुद्ध वंदना पठण घेऊन महामानवास अभिवादन केले. तसेच आज शुक्रवार 6.डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वा. पंचशील नगर मधील नागरिकांनी , तरुणांनी एकत्र येत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
-------------------------------------





