आदमापूरच्या उड्डाण पुलावर वाहन धारकांचे आक्रमण ; वाहतुकीची ऐसी तैसी

Kolhapur news
By -

 

            



             कोल्हापूर न्यूज नेटवर्क


आज  रविवार आमावस्या. बाळूमामा देवस्थानची मासिक यात्रा.तोबा गर्दी.

  वाहतुकीचे नियंत्रण ही नित्याचीच समस्या.

   त्यात उड्डाण पुलावर वाहनधारकांनी आपली वाहने लावून ठेवल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे.साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारे ट्रक , वडापवाले,रिक्षा वाले,खाजगी चार चाकी वाहने आणि देवदर्शनास पायी आलेले असंख्य पादचारी यामुळे रस्ते भरून जातात..

    खरं तर उड्डाण पुलाची निर्मिती वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी केली आहे.पण पुलावर च पार्किंग झाल्याने वाहतुकीची ऐसी की तैसी अवस्था पहायला मिळते.

    पोलिस आपापल्या परीने नियंत्रण करत असतात पण पुलावरच्या पार्किंग पुढे ते का नतमस्तक होतात हे समजत नाही.

     कायदा आणि सुव्यवस्था याचे भान नागरिकांना किंवा भाविकांना असतेच असे नाही.ते काम पोलिस प्रशासनाकडून अपेक्षित आहे.

   ही गर्दी आणि तिचे नियंत्रण फक्त एका दिवसाचे काम नाही.दरमहा अमावस्येला प्रचंड गर्दी असते.या यात्रे मुळे हजारो कुटुंबांचा रोजी रोटीचा प्रश्न सुटत असतो.बेरोजगारांच्या हाताला महिनाभराचे काम मिळत असते.बाळु मामांचे भक्त साधे भोळे आणि भाबडे असतात.अनामिक अपार श्रद्धेने ते मामांच्या भेटीला येत असतात.मुख दर्शन झाले की त्यांना मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

    या मासिक यात्रेचे महत्व लक्षात घेऊन गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण होणे अत्यंत गरजेचे आहे.

    भाविकांनी सुद्धा शिस्त आणि स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत.परवाच उड्डाण पुला नजिकच्या ओढ्यातील कचऱ्याचे निर्मूलन करण्याची मोहीम मुरगूड च्या शिवभक्त संघटनेने हाती घेतली होती.प्रत्येक महिन्याला असे काम अशक्य आहे.त्यामुळे देवस्थान मंडळ , ग्रामपंचायत , पोलिस प्रशासन आणि यात्रेकरू यांनी संयुक्तपणे या समस्या हाताळल्या पाहिजेत.


                  ---------------------------