कोल्हापूर न्यूज / वि . रा. भोसले
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीतातील या ओळी लोकसभेत उदहृत झाल्या. गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणात त्याचा अगदी मराठीत उल्लेख झाला.
ते म्हणाले राजकारण करा पण कोणाच्याही बलिदानाचा अवमान करू नका.ते बलिदान कोणत्याही धर्मातील,पंथातील किंवा राजकीय पक्षातील असो.
सावरकरांचा राहुल गांधी यांच्या कडून वेळोवेळी अवमान झाला पण त्यांच्या समवेत राजकीय युती करणाऱ्यांनी त्यावर आक्षेप घ्यायला हवा होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुध्दा असेच महान देशभक्त होते.ते एका निवडणुकीत पराभूत झाले.काँग्रेस पक्षाने त्यावेळी टीपणी केली होती की आंबेडकरांनी हिंदू गटांशी युती केल्याने त्यांचा पराभव झाला.वास्तविक डॉ.आंबेडकर यांच्या पराभवास काँगेसच जबाबदार होती.त्यांना आंबेडकर नको होते. बाबासाहेबांनी आर्टिकल ३७० ला सुध्दा कडाडून विरोध केला होता.तो ही नेहरूंना खटकला होता .शेख अब्दुल्ला यांच्या आग्रहामुळे ते कलम नेहरूंनी घुसडले होते.सरदार वल्लभ भाई पटेल यांनीही जोरदार विरोध केला होता.एक देश मग दोन झेंडे ,दोन कायदे कशाला ?
पुढे नेहरू घराण्याने साठ वर्षे भारताची सत्ता सोडली नाही.
गृहमंत्री शहा यांनी नेमके यावरच बोटं ठेवले होते.कितीवेळा तुम्हीं बाबासाहेबांच्या संविधानाची मोडतोड केली .आणि आता तुष्टिकरणाच्या राजकरणापोटी संविधान संविधान करत त्यांच्या नावाचा जप करता आहात ?
त्या ऐवजी भगवंताचे नाव घेतले असते तर मुक्ती लाभली असती.
या मध्ये त्यांना एवढच म्हणायचं होतं की राजकारणासाठी डॉ.बाबासाहेबांचा चुकीच्या पद्घतीने उपयोग करू नका.
पण तेवढेच निमित्त करून काँग्रेस खासदारांनी बाबासाहेबांचे फोटो हातात घरून संसदेसमोर निदर्शने केली.
मराठीत एक म्हण आहे.
' चोराच्या उलट्या ......
सावरकर, सुभाषचंद्र बोस,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्र भक्तीचे मोल करता येणार नाही.त्यांनी आपले जीवन कसल्याही फायद्याशिवाय राष्ट्रासाठी समर्पित केलेआहे.त्यांच्या आणि अशा असंख्य स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाचे शहा आणि मोदी यांनी अनेक वेळा कौतुक केले आहे.त्यांची भव्य स्मारके एन डी ए सरकारच्या कालावधीतच झाली आहेत.
काँगेस कडे सरकारवर टीका करण्यासरखे आता कांहीं शिल्लक राहिलेले नाही.
काँग्रेस कडे धुरंदर व प्रज्ञावान नेतेही उरले नाहीत.राहुल ,प्रियांका हे हिंदू विरोधी तर आहेतच शिवाय राष्ट्राचा विचार करण्या ऐवजी स्वतःच्याच घराण्याची स्तुति करत रहातात.
खर्गे सारख्यां बुजुर्ग नेत्यांना ही फारशी किंमत नसते.जयराम रमेश सारखे अगदी थोडे वयस्क नेते शिल्लक राहिले आहेत.
शहा यांच्या संसदेतील भाषणाचा रोख नीट समजला नाही किंवा समजूनच घेतला नाही .पुन्हा नीलाजरे प्रदर्शन करायला सरसावले आहेत.त्यापेक्षा थोडा राष्ट्राच्या विकासाचा, उध्दाराचा विचार झाला असता तर फार बरे झाले असते.
म्हणून सावरकरांच्या त्या ओळी प्रकर्षाने आठवतात .
'तुजवीण जनन ते मरण
तुजसाठी मरण ते जनन.'
--------------------------

