नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, नामदार आबिटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खाते

Kolhapur news
By -

 

         


          नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते मिळणार याकडे नजरा लागून राहिल्या होत्या. शनिवारी (२१ डिसेंबर २०२४) रात्री राज्य मंत्रीमंडळातील ३९ मंत्र्यांना खात्याचे वाटप करण्यात आले.


अतिशय महत्वाचे समजले जाणारे गृह व ऊर्जा खाते हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तर वैद्यकीय शिक्षण खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविले आहे. पहिल्यांदाच मंत्रीमंडळात समाविष्ठ झालेल्या राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हे आरोग्यमंत्री असतील. आबिटकर यांच्याकडे महत्वाचे खाते सोपविले आहे. महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळाकडे लक्ष लागले होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मात्र खातेवाटप रखडले होते. शनिवारी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झाले. यामध्ये दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षणखाते, पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपविली आहे.

            ----------------------------------