मुरगूड मध्ये भरत आहेत भव्य क्रिकेट सामने. एक प्रशस्त क्रीडांगण मात्र आहे उणे.

Kolhapur news
By -

 

              


              कोल्हापूर न्यूज /  वि .रा .भोसले


          मुरगूड ही घाटमाथ्यावरील पहिली क्रीडानगरी आहे असे म्हंटले तरी चालेल. किडांगणाच्या अभावामुळे कोकणात क्रिकेटचे सामने भरलेले कधी ऐकले नाही. मुरगूड मध्ये मात्र सर्व प्रकारचे सामने दरवर्षी भरत असतात. कबड्डी, खोखो, कुस्ती ,फुटबॉल आणि क्रिकेट असे सर्व प्रकारचे खेळ मुरगूड मध्ये मध्ये खेळले जातात.  असे असूनही या नगरीत एक प्रशस्त क्रीडांगण नाही.एस टी स्टँड समोर पोष्टाची जागा होती तेथे हॉलिबॉल,कुस्ती व कबड्डी चे सामने भरवले जायचे .त्या जागेवर आता पोष्टाची इमारत उभी झाली आहे.मराठी शाळेच्या क्रीडांगणावर देखील कुस्ती,क्रिकेट ,फुटबॉल सामने आजही भरवले जातात.या छोट्या क्रीडांगणाला  बाजूने कुंपण किंवा तटबंदी ही नाही.

   

फेब्रुवारी महिन्यात मुरगूड मध्ये सानिका स्पोर्ट्स या प्रथितयश संस्थे मार्फत भव्य क्रिकेट सामने भरवण्यात येत आहेत. सामन्यासाठी  भव्य करंडक व एक लाखापासुनची रोख बक्षिसे तसेच विशिष्ठ कौशल्य करंडक , इलेक्ट्रिक बाईक अशी मोठाली बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.प्रवेश फी ₹ ८५०० असून २५जानेवारी पर्यंत नावनोंदणी करण्यात येईल असे कळविण्यात आले आले आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातून दूर दूर वरून दरवर्षी क्रिकेट संघ या स्पर्धेसाठी येत असतात.यातील कांहीं खेळाडूंची राज्यपातळीवर सुध्दा निवड झाली आहे.दिवस रात्र विद्युत झोतात हे सामने भरत असल्याने प्रेक्षकांची मोठी गर्दी सुध्दा होण्याची शक्यता आहे.

 

      सानिका स्पोर्ट्स चे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मुरगूड मध्ये मोठ्या क्रीडांगणाची नितांत गरज आहे व तशी मागणी नगर परिषद व नगर विकास खात्याकडे वेळोवेळी करण्यात आली आहे.मुरगूड नंतर या भागात निपाणी व गडहिंग्लज मध्येही क्रिकेट व फुटबॉलचे  सामने भरत असतात.तेथे मोठी क्रीडांगणे उपलब्ध आहेत. मुरगूड मध्ये जे क्रीडांगण सद्या उपलब्ध आहे त्याचा नियोजन पूर्वक उपयोग करून आम्हीं सामने भरवतो असे त्यांनी सांगितले.

   

    जिल्ह्याला आता दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत.त्यामुळे क्रीडांगणाची ही उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सानिका मार्फत सांगण्यात आले.


           ----------------------------------