चि. प्रतिक प्रकाश पोतदार यांच्या विवाह सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

Kolhapur news
By -

 

            


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  पत्रकारांनी वेळोवेळी मांडलेल्या शहराच्या सामाजिक समस्येचे प्रश्न मुख्य कार्यकारी अभियंता प्रकाश पोतदार यांनी अत्यंत तत्परतेने व जिव्हाळ्याने सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.नगर परिषदेचे सभासद मंडळ बरखास्त झाल्यानंतर निर्णायक कामांची जबाबदारी त्यांचेवर येऊन पडली.मुख्य कार्यकारी अधिकारी व तज्ञ अभियंत्यांना सोबत घेऊन त्यांनी नगरपरिषदेच्या कामकाजात सेवाभावी वृत्तीने लक्ष घातले.त्यामुळे त्यांच्या विषयी पत्रकार संघात सुध्दा आपुलकीचे व विश्वासाचे वातावरण होते. 


 या आपुलकीचाच भाग म्हणून मुरगूड नगरपरिषदेचे निवृत्त चीफ ए्झिक्युटिव्ह इंजिनीयर प्रकाश पोतदार यांचे चिरंजीव प्रतिक यांच्या विवाह सोहळ्यातील स्वागत समारंभात मुरगूड येथील पत्रकार संघटनेने   उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या.यावेळी ज्येष्ठ पत्रकार वि. रा .भोसले,संदीप सूर्यवंशी,ओंकार पोतदार,राजू चव्हाण,समीर कटके, माजी प्राचार्य महादेव कानकेकर,वृक्ष मित्र प्रविण सूर्यवंशी,माजी उपप्राचार्य रविंद्र शिंदे,संकेत भोसले, मोहिते गुरुजी, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील , नामदेवराव मेंडके ,माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी, जयसिंग भोसले तसेच माजी नगरसेवक सुहास खराडे ,गुरुदेव सूर्यवंशी,यांचेसह अनेक माजी नगरसेवक स्वागत सोहळ्यास उपस्थित होते.वरपिता प्रकाश पोतदार यांनी स्वागत केले. 


     

         --------------------------------