गोवऱ्या आणि फुले ' पुस्तकास सर्वोत्तम साहित्य निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Kolhapur news
By -

 

            


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      मुरगुडचे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक प्रा.चंद्रकांत माळवदे यांच्या 'गोवऱ्या व फुले 'या पुस्तकास सर्वोत्तम साहित्य निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.

   वंदना प्रकाशन पुरस्कृत  आशिर्वाद पुरस्कार असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते तो माळवदे यांना वितरित करण्यात आला.या वेळी ई प्रतिष्ठान   संस्थापक सूनीळ सामंत,मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष रविंद्र शोभणे,मुंबई विद्यापीठ हिंदी विभाग प्रमुख रविंद्र प्रतापसिंह ,इंग्लिश साहित्य अभ्यासक श्रीखंडे,स्पर्धा संयोजक साहित्यिक डॉ.सुनील सुनील सावंत ई मान्यवर उपस्थित होते.

     विविध साहित्य व सामाजिक क्षेत्रातील संस्था व व्यक्ती यांचेकडून   माळवदे यांचे अभिनंदन होत आहे.हे पुस्तक अत्यंत प्रेरणादायक असल्याचे  मत अनेक साहित्यप्रेमीं व्यक्त केले.



           --------------------------