कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत, बेघर, निराधार महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या एकटी या समाजसेवी संस्थेस वडणगे येथे सामाजिक कार्यकर्ते सागर रंगराव पाटील यांनी स्व मलिकेची जमीन संस्थेला देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. माणसाने माणूसकीचा धर्म जोपासत गोर गरीब, निराधार लोकांना मदतीसाठी प्रयत्न करावेत. असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते सागर रंगराव पाटील यांनी यावेळी केले.
कोल्हापुरातील शाहूपुरी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते, सागर रंगराव पाटील यांनी, वडणगे निगवे रोडवरील त्यांच्या मालकीची पाच गुंठे जमीन एकटी संस्थेला दान दिली आहे. त्यांचे वडील रंगराव पाटील यांच्या स्मरणार्थ दान केली. याठिकाणी एकटी संस्थेच्या माध्यमातून, अण्णा- माई सेवासदन सुरू करण्यात आलय. या जागेच्या उद्घाटन कार्यक्रम आज सोमवारी पार पडला. वडणगेच्या सरपंच संगीता पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. तर गीतादेवी रंगराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
---------------------

