शालेय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेतील सर्वच प्रकारात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संकेत पाटील वर अभिनंदनचा वर्षाव

Kolhapur news
By -

 

                



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची सुरुवात शालेय  जडणघडणीपासूनच होत असते. व्यक्तिमत्व विकासाला आकार देण्याचा शालेय जीवन हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय क्रीडा स्पर्धा हा एक त्यातीलच भाग असतो. शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक मध्ये जेवढे क्रीडा प्रकार आहेत तेवढ्या सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम  क्रमांक मिळवणे ही मोठी आव्हानात्मक गोष्ट. पण ही आव्हानात्मक गोष्ट साध्य करून दाखवली आहे विद्यामंदिर गलगले च्या सातवी  मधील संकेत दिलीप पाटील  या विद्यार्थ्यांने. शालेय क्रीडा स्पर्धेतील सर्वच वैयक्तिक प्रकारांमध्ये    म्हणजेच लांब उडी ,उंच उडी ,गोळा फेक,थाळीफेक ,१०० मीटर धावणे ,६०० मीटर धावणे एकाच विद्यार्थ्यांने  प्रथम क्रमांक मिळवण्याची जिल्ह्यातील ही बहुदा पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. 


         संकेतच्या या यशाबद्दल खडकेवाडा केंद्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. परिस्थितीची साथ नसलेल्या  व शेतमजुराच्या  मुलाचे म्हणजेच संकेतचे हे यश प्रेरणादायी असेच आहे. संकेत या गुणी खेळाडूस  भविष्यातील वाटचालीसाठी मदतीची आणि  मार्गदर्शनाची गरज आहे. 


        संकेतला विद्यामंदिर गलगले चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले . 

    

 शालेय क्रीडा स्पर्धेतील या नेत्रदीपक यशानंतर संकेतला विचारले असता ,भविष्यात आपणास क्रीडा क्षेत्रातच करिअर करावयाचे असल्याचे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले . 


              ----------------------------