पुणे : शासकीय किंवा पोलीस अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. पण लाच देणाऱ्यालाच अँटीकरप्शनच्या ताब्यात देण्याची घटना पुणे येथील बंडगार्डन पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे.
फ्लॅट खरेदी विक्री करणारा एजंट बारटक्के हा बंडगार्डन पोलीस स्टेशनचे एपीआय नंदकुमार कदम यांना आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करत होता. एजंट बारटक्के वारंवार लाच देण्याचा प्रयत्न करू लागल्यामुळे एपीआय नंदकुमार कदम यांनी अँटी करप्शनला याची माहिती दिली आणि त्यालाच लाच देताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात अडकवले. लाच देणाऱ्यालाच अँटीकरप्शनच्या जाळ्यात अडकवण्याची ही एक दुर्मिळ घटना आहे, म्हणून एपीआय नंदकुमार कदम यांचे अभिनंदन केले जात आहे. एपीआय नंदकुमार कदम हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील आहेत.
--------------------------------------

