कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड मधील सोनाबाई पांडुरंग घाटगे,मुलगी,जावई आणि मुले असे सात माणसांचे अत्यंत गरीब कुटुंब.ना जमीन ना घर. जगण्याची उमेद मात्र सोडली नाही.
दिवसभर मिळेल ते काम करायचे आणि कशीतरी पोटं भरायची.
एखादी संध्याकाळ अशीही असायची की हाता तोंडाची भेटच नसायची.फाटक्या चंद्रमौळी निवाऱ्यातून येणारे किरण,पावसाचे पाणी आणि घोंगावणारे डास यांची सोबत असायची.
निवृत्त प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख उर्फ काकाजी यांची वैचारिक आणि अध्यात्मिक बैठक लाभलेल्या मुरगूडच्या शिवम परिवाराने या कुटुंबाला घर बांधून द्यायचे ठरवले.भराभर विटा,सिमेंट ,दरवाजे , वाळू इत्यादी साहित्य जमा झाले.बांधकाम कामगारांची भूमिका सुध्दा परिवाराच्या साधकांनीच पार पाडली.
आवशक तेथे कारागीर बोलावले.एक टुमदार घर तयार झाले.
१९ ऑक्टोबर रोजी काकांच्या वाढदिवशी घर बांधणीची सुरुवात झाली.अवघ्या आठ दिवसात २ लाखांचा मदत निधी जमा झाला आणि १० डिसेंबर ला घर पूर्ण झाले.दिनांक १२ डिसेंबर रोजी राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले आणि मुरगूड चे पोलिस उपनिरीक्षक शिवाजीराव करे यांच्या उपस्थितीत गृह प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.निमंत्रण अर्थात सर्व समाजप्रेमी साधक नागरिकांना आहे.
------------------------------------


