बांगला देशात हिंदू अजून किती सहन करणार ? भारत सरकार काय करते?

Kolhapur news
By -

 

        


              कोल्हापूर न्यूज  / वि.रा.भोसले


     बांगला देशात हिंदुंचा अनन्वित छळ होत आहे.हिंदू महिलांच्या वर अत्याचार होत आहेत.

    कट्टर पंथीयांना सरळ सरळ पाकिस्तानातील अतिरेक्यांचा पाठिंबा आहे.तेथील विद्यार्थ्यांनी आधी आरक्षण विषयक चळवळ सुरू केली.त्या चळवळीने उग्र रूप धारण केले .परिणामी  अध्यक्षा शेख हसीना यांना पलायन करावे लागले.त्यांनी भारताचा  आश्रय घेतला आहे.

     या घडामोडीनंतर बांगला देशात नोबल पुरस्कार प्राप्त मोहम्मद युनूस यांनी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला.त्यांच्या नियुक्तीनंतर वातावरण सुधारेल अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा फोल ठरली आहे.मोहममद युनूस नुसती बघ्याची भूमिका घेत आहेत.

    राजकारण कशाशी खातात हेच माहीत नसलेला हा अध्यक्ष म्हणजे आपल्याकडील गुळाचा गणपती असेच म्हणावे लागेल.

     तेथील विद्यार्थी चळवळीने भलतेच वळण घेतले आहे .या तरुण पोरांना तेथील तरुण हिंदू मुली समोर दिसताहेत.या मुलींना कसलेही संरक्षण नाही.तेथील. इस्कॉन मंदिर वअन्य हिंदू मंदिरावर हल्ले होत आहेत.गायींची बेसुमार कत्तल होत आहे.

    तेथील विद्यार्थी चळवळीला कांहीं ताळतंत्रच राहिले नाही.

 नोकऱ्या,बेरोजगारी हे मूळ प्रश्न बाजूलाच राहिले असून धर्म परिवर्तनाच्या नावाखाली हिंदूना अक्षरशः उघडे नागडे करून चाबकाने फटकारले जात आहे.

    या निष्पाप जीवांची काय चूक की त्यांनी बांगला देशात जन्म घेतला. त्यांच्या तेथील घरे व मालमत्तेचे काय ?

     त्यांना तेथे कोणीच वाली नाही.

    अशावेळी प्रश्न पडतो 

तो हा की भारत सरकार करते काय ?

    धर्म निरपेक्ष लोकशाही म्हणून काश्मीर ,केरळ मणिपूर येथील हिंसाचार नुसता आठवत राहणार की पुन्हा पुन्हा पहात राहणार ? बांगला देशातील हिंदू याच देशाचे पूर्वज आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी कोणती पावले उचलली.केवळ पत्रे पाठवून आणि निषेध करून हे शक्य नाही.

   इस्राईल अस्तित्वासाठी झुंजत आहे.त्याचे कौतुक जरूर करा पण त्यांच्याकडून कांहीं शिका .

    एक जबरदस्त तंबी बांगला देशला व  मोहंमद युनूस ला दिलीच पाहिजे.

 काय होईल ? कोण मध्ये पडणार नाही.ज्याचे त्याचे आपले प्रश्न आहेत.

   बांगला देशच्या हिंदूना न्याय देण्यासाठी भारत सरकारने पावले उचलली तर निश्चितपणे जगात देशाचा वेगळा दबदबा तर तयार होईलच त्याशिवाय भारतातील नव्वद टक्के जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल.दुर्दैवाने विरोधी आघाडीतील एकाने सुध्दा  हिंदू वरील अत्याचारवर एका शब्दचादेखील निषेध नोंदवला नाही.

     भारत सरकार सुध्दा तसेच निष्क्रिय राहिले तर आसेतू हिमाचल एक उग्र आंदोलन भारतात सुरू होईल.

               -----------------------------