देवाभाऊंचे नवे सरकार ... महाराष्ट्राला पडलेले सुंदर स्वप्न साकार करणार ?

Kolhapur news
By -

 

         


         कोल्हापूर न्यूज   /  वि.रा.भोसले


   ५ डिसेंबर २४ , देवाभाऊंच्या रूपाने एक स्वयंभू नेतृत्व लाभले आहे.२५ वर्षे महाराष्ट्राच्या  राजकारणावर मांड ठोकून हा योद्धा लढतो आहे.५० वर्षे जाती पातीचे राजकारण करून सिंहासन बळकवणाऱ्या स्वयंघोषित जाणता राजाला हे न पेलवणारे आव्हान आहे. होय,आव्हान !

फडणवीस ना संपवण्यासाठी काय नाही केलं यांनी....? पण पट्ट्या घाबरला नाही.शिवछत्रपतींचा जयजयकार करत महाराष्ट्रभर फिरला.विदर्भ ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र जिंकत पश्चिम महाराष्ट्रात घुसला.नरेंद्र आणि अमित हे योद्धे पाठीवर होतेच.

'छत्रपती शिवाजी महाराज की जय '

 'एक हैं तो सेफ हैं,'

'बटेंगे तो कटेंगे '

' सबका साथ '

'सबका विकास ,सबका विश्वास '


     यासारखी अस्त्रे घेऊन हा योद्धा  भर मैदानात उतरला .


    He came

      He saw 

 And he conquered.


   ज्युलिअस सिझर साठी प्रसिद्ध असलेली ही उक्ति   देवाभाऊने खरी करून दाखवली. एकनाथ आणि अजितदादा हे दोन बिणीचे घोडेस्वार आघाडी सांभाळत होते.मागे रणरागिणी चाबकांचे आसूड उगारून सज्ज होत्या. 

            मैदान सुपडा साफ.

ई व्हीं एम नावाची गोम वळवळ करून बाजूनेच निघून गेली .

      'महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा '

  नावाचा झंझावात कधी आणि कसा आला हे कळलेच नाही.तुतारी ची पिपाणी झाली. मशाल विझून गेली,हात लूळा पडला.

देवा भाऊंच्या नेतृत्वावर आक्षेप घ्यावा असे कांहीच नव्हते.मध्यंतरी राज्यसभेचे कांहीं खासदार निवडले गेले तेंव्हा त्यांच्यातला 'चाणक्य 'सुध्दा महाराष्ट्राने पहिला.

       माझी कसली संस्था नाही,कोणता कारखाना नाही ,कोणते मोठे पद नाही . जनसेवेचे व्रत घेऊन गेली २५ वर्षे राजकारणात वावरतोय .जनतेने घरी जा म्हणून सांगितले तर निमूटपणे निघून जाईन असे भावोत्कट उद्गार देवेंद्रजीनी  एका मुलाखतीत काढले.

   

       राजकारणाचा धंदा मांडलेल्या मतलबी नेत्यांच्या कानशिलात लगावलेली ती चपराक होय.अशा कर्तृत्ववान नेत्याला अनाजी म्हणून वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला गेला.

     राजे विशाळगडावर पोचून पाच तोफांची सलामी देईपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही असे म्हणणाऱ्या बाजीप्रभूंच्या बलिदानाचा मात्र घरभेद्यांना विसर पडावा.

   महाराष्ट्राच्या कपाळावर कोरलेला जातिभेदाचा डाग देवेद्रांच्या निवडीने पुसून टाकला आहे. शपथविधी सोहळ्याच्या वेळी पसरलेल्या जन सैलाबावर कॅमेरा फिरला तेंव्हा हजारो गरीब मुस्लिम बांधवांच्या चेहेऱ्यावर फुललेले हास्य सुध्दा पहायला मिळाले.माणुसकी हा एकच धर्म नावाची एक हळुवार झुळूक त्या सोहळ्यात वहात होती.

    ना नफरत की नशा ,ना मोहब्बत की टपरी .

     देवा भाऊ हे कांहीं उपरे नेतृत्व नाही.

   ते एक स्वयंभू नेतृत्व आहे. त्यांच्या निस्पृह नेतृत्वाखाली स्थापन होणारे सरकार म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे.


     ---------------------------------------------