कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सावर्डे बुद्रुक येथील जिजाऊ माता गोशालेचा पहिला वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला.राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सावर्डे बुद्रुक येथे गुजरातच्या दोषी कुटुंबाने ही गोशाळा स्थापन केली आहे.त्यामागील कथा देखील रंजक आहे.
सावर्डे बु .येथील अनिल शेटके हा युवक गुजरात मध्ये दोषी कुटुंबाच्या तेथील गोशाळेत कामगार म्हणून काम करत होता.गायींची सेवा करत असताना त्याला त्यांचा इतका लळा लागला की स्वतःच्या कुटुंबातीलच सदस्य असल्याप्रमाणे त्यांच्यावर तो प्रेम करू लागला.गुजरातेतील पालीखाना येथे राजू भाई दोषी आणि विरल भाई दोषी यांच्या मालकीची ती गोशाळा होती.मुळातच गरीब आणि कनवाळू असलेल्या गोमातेच्या अंगावरून हात फिरवताना अनिलच्या डोळ्यात तारारणारे अश्रू राजुभाई ना दिसले.
"तुला सुरू करायची आहे का अशी आमच्या सारखी गोशाळा ?"
"साहेब तेवढं कुठलं भांडवल असणार माझ्याजवळ.! !"
" ती काळजी नको. आम्हीं भांडवल पुरवतो.तुझा व्यवसाय सुरू कर हळू हळू परत फेड कर."
गेल्यावर्षी अनिलची गोशाळा सुरू झाली.दहा गुंठे जागेत जवळजवळ पन्नास भर गाई आहेत.राजू भाई आणि विरल भाईंनी त्यांच्या पाठीवर त्यावेळी ठेवलेला हात अजूनही त्याला जाणवतो.मध्यंतरी कोकणातून तस्करांनी मध्यरात्री आणलेले गोवंश मुरगूड येथील शिवभक्तांच्या सतर्कते मुळे पकडले गेले.पंचनामे झाले.हिंदुत्ववादी शिवभक्तांनी ते सर्व गोवंश अनिलच्या जिजाऊ माता गोशाळेत पाठवले .
दोषी बंधूंनी त्यांच्या भुतदयेचे तोंड भरून कौतुक केले.गुजरात मध्ये गोमाता कायदा किती कडक पाळला जातो हेही त्यांनी सांगितले.
गोरक्षक हिंदुत्ववादी सर्व कार्यकर्ते आता सजग झाले आहेत.अनिलची प्रेरणा घेऊन गोमतेच्या. सेवेला वाहून घेणाऱ्या सर्व युवकांना त्यांनी संपूर्ण पाठिंबा व संरक्षण द्यायचे ठरवले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने गाईच्या दूध ,तूप आणि तत्सम उत्पादनांना आरोग्यवर्धक उत्तम दर्जा दिला आहे.वर्धापन दिनास खालील मान्यवर उपस्थित होते.
कलावती आनंदराव दोषी,मिनमेन पंकज भाई संघवी,नेहा विरल दोषी, ,राजू भाई आणि विरल भाई दोषी शिवभक्त सर्जेराव भाट , तानाजी भराडे , संकेत आहे भोसले,महादेव वागनेकर, अवधुत यादव रवि माने आदी.
------------------------------------------


