कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुबई : मकर संक्रांतीच्या गोड मुहूर्तावर कोल्हापूर विभागातील राधानगरी गारगोटी व आजरा या आगारासाठी तब्बल ६० नव्या बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिली.
आज मंत्रालय मध्ये मंत्री आबिटकर यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना राधानगरी , गारगोटी आणि आजरा आगारासाठी ६० नवीन लालपरी बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागात वसलेले आजरा, गारगोटी आणि राधानगरी हे तालुके आहेत. या तालुक्यातील वाड्या-वस्त्या पर्यंत एसटी महामंडळाच्या बसेस आपली सेवा बजावत आहेत. परंतु त्या बसेस अत्यंत अपुऱ्या व जुन्या असल्यामुळे या भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य जनतेला प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. या वस्तुस्थितीकडे मंत्री आबिटकर यांनी परिवहन मंत्री महोदय यांचे लक्ष वेधले. तसेच गाड्यांच्या कमतरतेमुळे गाड्या वेळेवर न सुटणे, गाड्यां ना दुरुस्त होणे , गाड्या रद्द होणे अशा प्रकारामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड त्रासली आहे. हेही लक्षात आणून दिले.
या पार्श्वभूमीवर भविष्यात महामंडळाकडे येणाऱ्या लेलँड कंपनीच्या स्वमालकीच्या नव्या बसेस पैकी २० बसेस राधानगरी आगारासाठी, २० बसेस गारगोटी आगारासाठी व २० बसेस आजरा आगारासाठी तातडीने उपलब्ध करून द्याव्यात .जेणेकरून भविष्यात या तालुक्यातील जनतेला चांगली प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करून देता येईल.अशी विनंती केली. लवकरच आपल्या तालुक्यातील आगारांना जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून देता येतील, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
------------------------


