एक लाखाच्या बक्षिसासाठी मुरगुड मध्ये रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

Kolhapur news
By -

 

        


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 एक  लाखाच्या पैजेमुळे चर्चेत आलेल्या मुरगूडच्या बैलगाडी शर्यतीत करवीर तालुक्यातील कुर्डूवाडी च्या  शिवा कुर्डू यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावून एक लाखाचे बक्षीस जिंकले . कोगनोळीच्या बबलू बस्तवडेच्या बैलजोडीने दुसरा नंबर मिळवला  ,आणि तिसरा क्रमांक  इंगळीच्या विकास खोत व इंगळे आण्णा यांच्या बैलगाडीने पटकावला. 


         बक्षिस वितरण माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले ' बजरंग सोनुले माजी नगरसेवक जगन्नाथ  पुजारी ,विक्रम गोधडे ,दत्तात्रय मंडलिक आदिंच्या हस्ते  करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे होते. 


     ------------------------------------------